२०२४ मध्ये गाजलेले सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

२०२४ मध्ये थिएटरमध्ये गाजलेले सिनेमे आता OTT वर येत आहेत! या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बॉलीवूड, दाक्षिणात्य आणि हॉलीवूड चित्रपटांची भरपूर यादी आहे. यात ‘देवरा पार्ट १’, ‘वेट्टैयन’, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ आणि ‘डेडपूल आणि वूल्वरिन’ यासारखे चित्रपट समाविष्ट आहेत. तसेच अनुपम खेर स्टारर ‘विजय ६९’ आणि ‘इट एंड्स विद अस’ या चित्रपटाचे OTT वर प्रीमियर देखील या आठवड्यात होणार आहे.
२०२४ मध्ये थिएटरमध्ये गाजलेले सिनेमे आता OTT वर येत आहेत! या आठवड्यात नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर बॉलीवूड, दाक्षिणात्य आणि हॉलीवूड चित्रपटांची भरपूर यादी आहे. यात ‘देवरा पार्ट १’, ‘वेट्टैयन’, ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ आणि ‘डेडपूल आणि वूल्वरिन’ यासारखे चित्रपट समाविष्ट आहेत. तसेच अनुपम खेर स्टारर ‘विजय ६९’ आणि ‘इट एंड्स विद अस’ या चित्रपटाचे OTT वर प्रीमियर देखील या आठवड्यात होणार आहे.

OTT वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार चित्रपट या यादी

२०२४ मध्ये थिएटरमध्ये गाजलेले सिनेमे या आठवड्यात OTT वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 

नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांसाठी भरपूर मनोरंजनाचा धमाका आहे. कारण- या काळात अनेक नवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत. २०२४ मध्ये थिएटरमध्ये गाजलेले सिनेमे या आठवड्यात OTT वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यात दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर हॉलीवूड आणि बॉलीवूडचा तडकादेखील बघायला मिळणार आहे. चला, पाहूया यातील काही खास चित्रपटांबद्दल.

देवरा पार्ट १

ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर व सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘देवरा पार्ट १’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी ओटीटीवर रिलीज झाला आहे. कोरताला शिवा दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, तमीळ, मल्याळम, कन्नड व हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’वर हिंदी भाषेत २२ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

वेट्टैयन

रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वेट्टैयन’ हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी ‘प्राइम व्हिडीओ’वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सुपरकॉपच्या कथेवर आधारित आहे.

द बकिंगहॅम मर्डर्स

दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट आता नेटफ्लिक्सवर ८ नोव्हेंबरपासून स्ट्रीम होत आहे. त्यामुळे चाहत्यांना वीकेंडला हा सिनेमा पाहण्याची उत्तम संधी आहे.

विजय ६९

अनुपम खेर यांच्या अभिनयाने सजलेला ‘विजय ६९’ हा चित्रपटही ८ नोव्हेंबरपासून नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. त्यात अनुपम खेर यांनी ६९ वर्षांच्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे; ज्यामुळे प्रेक्षकांना हटके कथानक अनुभवता येणार आहे.

इट एंड्स विद अस

‘इट एंड्स विद अस’ हा एक हॉलीवूड चित्रपट असून, तो ९ नोव्हेंबरपासून ‘नेटफ्लिक्स’वर स्ट्रीम होणार आहे. हॉलीवूड चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा चित्रपट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

डेडपूल आणि वूल्वरिन

सिनेमाघरांत धुमाकूळ घालणारा ‘डेडपूल व वूल्वरिन’ हा हॉलीवूडचा चित्रपट आता ओटीटीवर येत आहे. मार्व्हल युनिव्हर्सचा हा चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’वर उपलब्ध होणार आहे. या सिनेमात रायन रेनॉल्ड्स आणि ह्युज जॅकमॅन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Review