काँग्रेस नेत्याला उमेदवाराला पाठींबा देणं भोवलं; पक्षातून सहा वर्षे निलंबन

काँग्रेसने घेतले कडक पाऊल

मावळ विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या अर्ज भरण्याच्या वेळी हजर राहिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांना पक्षातून सहा वर्षे निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी सांगितले की, पक्षशिस्त मोडल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

दाभाडे आणि आमदार शेळके नातेवाईक असून दाभाडे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून मावळ विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र सध्या ते काँग्रेसमध्ये असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. मावळमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत आणि उमेदवारास पाठिंबा देण्याबाबतही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. अशा स्थितीत दाभाडे यांच्या उपस्थितीने काँग्रेसच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेसने घेतले कडक पाऊल

काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक असून आमदार शेळके हे महायुतीचे उमेदवार आहेत. दाभाडे यांनी शेळके यांच्या मंचावर हजेरी लावल्याने काँग्रेसने त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तालुकाध्यक्ष मोहोळ यांनी सांगितले की, "प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार संजय जगताप यांच्या आदेशानुसार माऊली दाभाडे यांचे निलंबन करण्यात आले आहे."

मावळची लढत झाली चुरशीची

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे राजकीय तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, राष्ट्रवादीच्या बापू भेगडे यांनी बंडखोरी करत भाजपचा पाठिंबा स्वीकारला आहे. त्यामुळे मावळमधील निवडणूक राज्यातील सर्व पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाची बनली आहे.

Review