राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश; महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा?
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, महायुतीसह विविध पक्षांमध्ये राजकीय हालचाली सुरू आहेत. अशा वेळी आज (२५ ऑक्टोबर) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका तासात चार प्रमुख नेत्यांचा पक्षप्रवेश झाला असून, त्यांना तत्काळ उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हा महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष इशारा मानला जातोय.

महत्त्वाचे पक्षप्रवेश कोण?
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील
वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी
सांगली भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील
माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर
कोण कोणाच्या विरोधात उभे?
संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील
राष्ट्रवादी (अजित पवार) कडून संजय काका पाटील तासगाव-कवठेमहांकाळमधून उभे आहेत, तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून रोहित पाटील प्रतिस्पर्धी आहेत.
झिशान सिद्दिकी विरुद्ध वरुण सरदेसाई
झिशान सिद्दिकी यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवारी मिळाली असून, त्यांचा सामना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वरुण सरदेसाई यांच्याशी होणार आहे.
जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील
भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील इस्लामपूरमधून राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उभे राहणार आहेत, तर राष्ट्रवादी (शरद पवार) कडून जयंत पाटील प्रतिस्पर्धी आहेत.
प्रताप चिखलीकर - लोहा कंधारमधून उभे
माजी खासदार प्रताप चिखलीकर यांना लोहा कंधारमधून राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवारी देण्यात आली आहे.
सना मलिक - अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवणार
राष्ट्रवादी (अजित पवार) नेते नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत.