पिंपरी-चिंचवड: दिवाळीच्या आधी फटाक्यांवर महापालिकेची कडक नजर

विनापरवाना स्टॉलवर कारवाईचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीच्या सणाच्या आधी फटाका विक्रेत्यांवर महापालिकेची कडक नजर आहे. फटाका स्टॉलसाठी परवानगी घेणे आवश्यक असल्याने, महापालिकेने अग्निशामक विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून परवानगी प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत 60 व्यावसायिकांनी परवानगी घेतली आहे.

महापालिकेने यंदा फटाका स्टॉलसाठी दोन हजार रुपये शुल्क आकारले आहे. फटाका स्टॉल फक्त बांधकाम असलेल्या गाळ्यांमध्येच उभारता येतील, तर मोकळ्या जागेवर स्टॉल लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अग्निशामक विभागाने आगीच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षितता साधनांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

विनापरवाना फटाका स्टॉलवर कठोर कारवाई

महापालिकेचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी विनापरवाना फटाका स्टॉल उभारल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे आणि व्यावसायिकांना परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे.

Review