सूरज चव्हाण: 'राजा राणी' चित्रपटावर अन्याय होतोय
सूरज चव्हाण: 'राजा राणी' चित्रपटावर अन्याय, सोशल मीडियावर प्रेक्षकांना समर्थनाचं आवाहन
पुणे,– 'बिग बॉस मराठी ५' फेम सूरज चव्हाण सध्या आपल्या 'राजा राणी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला असला तरी, त्यावर अन्याय होत असल्याचं सूरजने एका सोशल मीडिया व्हिडिओमध्ये सांगितलं.
सूरजने प्रेक्षकांना चित्रपटाला समर्थन देण्याचं आवाहन केलं. त्याच्या म्हणण्यानुसार, "आमच्या 'राजा राणी' चित्रपटावर अन्याय होतोय. थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघा आणि सपोर्ट करा." त्याने असेही सांगितले की, हा चित्रपट चांगल्या प्रतिसादासह प्रदर्शित झाला असला तरी काही लोक त्याला बंदी घालण्याची मागणी करत आहेत.
चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत असलेल्या रोहन पाटीलनेही त्याच्या समर्थनार्थ सांगितलं, “आता सूरजने म्हटल्याप्रमाणे, हा सिनेमा काही लोकांना आवडत नाही. पण आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे की ते या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील.”
तथापि, अॅड. वाजिद खान यांनी चित्रपटातील आत्महत्येच्या प्रसंगावर आक्षेप घेत, समाजाला चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप करत चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे.
सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी ५' मधून प्रसिद्धी मिळवली असून, 'राजा राणी' हा त्याचा मोठ्या पडद्यावरील पहिला चित्रपट आहे.