पुण्याचे नवे नेतृत्व कोण?

पुण्याचा इतिहास : नेतृत्वाचा बदल

पुणे, 23 ऑक्टोबर 2024 – पुण्याच्या चौफेर विकासासोबतच शहरातील मतदारसंख्या आणि मतदारसंघांमध्ये वाढ होत आहे, आणि त्याचबरोबर पुण्याच्या नेतृत्वात बदल घडत आहेत. राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असल्यास, त्या पक्षाचा खासदार किंवा प्रमुख नेता पुण्याचा कारभार सक्षमपणे सांभाळताना दिसून आलेला आहे. मात्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता वेगवेगळ्या पक्षांच्या हाती असल्यानं नेतृत्वावर प्रश्नचिन्ह राहिले आहे.

पुण्याचा नवा कारभारी कोण? आगामी निवडणुकांवर लक्ष

पुणे, 23 ऑक्टोबर 2024 – पुण्याच्या चौफेर विकासासोबतच शहरातील मतदारसंख्या आणि मतदारसंघांमध्ये वाढ होत आहे, आणि त्याचबरोबर पुण्याच्या नेतृत्वात बदल घडत आहेत. राज्यात आणि महापालिकेत एकाच पक्षाची सत्ता असल्यास, त्या पक्षाचा खासदार किंवा प्रमुख नेता पुण्याचा कारभार सक्षमपणे सांभाळताना दिसून आलेला आहे. मात्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता वेगवेगळ्या पक्षांच्या हाती असल्यानं नेतृत्वावर प्रश्नचिन्ह राहिले आहे.

पुण्याचे नवे नेतृत्व कोण?

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असणार आहे, तर महाविकास आघाडीला यश मिळाल्यास शरद पवार गटाचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना शिंदे पक्ष किंवा काँग्रेस-शिवसेना ठाकरे पक्ष यांच्या समोर राष्ट्रवादीचा अडथळा असणार आहे, ज्यामुळे पुण्याचे नवे नेतृत्व कोण असेल, यावर सस्पेन्स कायम राहणार आहे.

पुण्याचा इतिहास : नेतृत्वाचा बदल

पुण्याच्या नगरपालिकेपासून ते आतापर्यंतचे नेतृत्व विचारात घेतल्यास, कालानुसार पुण्याचे कारभारी सतत बदलत गेले आहेत. काकासाहेब गाडगीळ हे पुण्याचे पहिले कारभारी म्हणून ओळखले जातात, तर पुढे काँग्रेस आणि समाजवादी विचारवंतांच्या नेतृत्वाने पुण्याचा कारभार हाकला. ना. ग. गोरे आणि एस. एम. जोशी यांसारख्या नेत्यांनी पुण्यावर प्रभाव पाडला.

१९८० च्या दशकात माजी केंद्रीय मंत्री विठ्ठलराव गाडगीळ यांनी सलग १५ वर्षे पुण्याचे नेतृत्व सांभाळले, तर १९९६ नंतर सुरेश कलमाडी यांनी केंद्र, राज्य आणि महापालिकेत काँग्रेसची सत्ता असल्याचे फायदे घेऊन पुण्यावर प्रभुत्व निर्माण केले. “कलमाडी बोले आणि पुणे चाले” अशी स्थिती होती.

मात्र, कलमाडी यांचे पर्व संपल्यानंतर भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी पुण्याचा कारभार सांभाळला. बापट यांच्या निधनानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कारभार आला, पण अजित पवार यांच्या पालकमंत्री बनल्यानं पुण्यात नेतृत्वावर एकमुखी नियंत्रण राहिले नाही.

आगामी निवडणुकांमध्ये पुण्याचे नवे नेतृत्व कोण?

आता विधानसभा निवडणुकांनंतर, पुण्याचे नेतृत्व पुन्हा पाटील यांच्याकडे जाईल की अजित पवार यांच्याकडे, यावर सस्पेन्स आहे. तसेच महाविकास आघाडी विजयी झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात वर्चस्वासाठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याचा नवा कारभारी कोण, याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल.

Review