महाविकास आघाडीतील उमेदवारांचा मुंबईत धावपळ
अद्याप कोणाला टिकिट मिळेल हे स्पष्ट नाही
पिंपरी: महाविकास आघाडीतील उमेदवारांचा मुंबईत धावपळ; अद्याप कोणाला टिकिट मिळेल हे स्पष्ट नाही
पिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. भाजपने महायुतीतून चिंचवडसाठी शंकर जगताप आणि भोसरीसाठी विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण, महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तीनही मतदारसंघांवर दावा करीत आहे, तर शिवसेना (ठाकरे गट) पिंपरी आणि भोसरी मतदारसंघांवर आपला हक्क सांगत आहे. पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्याविरोधात पक्षात वाढलेला विरोध आणि महाविकास आघाडीतील उमेदवारी ठरवण्याच्या विलंबामुळे संभाव्य इच्छुकांनी मुंबईला धाव घेतली आहे.
इच्छुकांची हालचाल: राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, शिवसेना (ठाकरे गट) चे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यासह अन्य इच्छुक मुंबईत आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करीत आहेत. शिवाय, चिंचवडमधील माजी नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, आणि चंद्रकांत नखाते यांची शरद पवार यांनी बैठक घेतली आहे.
यात शिवसेना (ठाकरे) गटाने पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला मिळावा असा आग्रह धरला आहे, परंतु उमेदवार राष्ट्रवादी (शरद पवार) गटातून येण्याची शक्यता आहे.