बजरंग आणि विनेशची चळवळ स्वार्थी वाटली

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या चळवळीवर ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिकने थेट टीका केली आहे.

साक्षी मलिकने बजरंग आणि विनेशवर टीका केली

बजरंग आणि विनेशची चळवळ स्वार्थी वाटली

नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्या चळवळीवर ऑलिम्पिक पदकविजेती कुस्तीगीर साक्षी मलिकने थेट टीका केली आहे. साक्षीने आपल्या ‘विटनेस’ या पुस्तकात हे विधान करत चळवळ स्वार्थी वाटल्याचे मत व्यक्त केले आहे.

साक्षीने पुस्तकात म्हटले आहे की, “महासंघाविरुद्धची ही चळवळ होती. परंतु, बजरंग आणि विनेश यांनी आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणीतून सूट मागितल्यावर त्यांच्या लढ्याची भूमिका स्वार्थी असल्याचे वाटले.” तिच्या मते, त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांचे कान भरल्यामुळे लढाईला धक्का बसला.

साक्षीने स्पष्ट केले की ती निवड चाचणीतून सूट घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. तथापि, बजरंग आणि विनेशवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींचे नाव तिने उघड केले नाही.

साक्षीने वैयक्तिक आयुष्यावरही पुस्तकातून भाष्य केले असून, कुटुंबीयांनी तिच्या पुरस्कारांच्या रकमेचा वापर केला असल्याचे ती म्हणाली. तिने सत्यव्रत काडियानशी विवाह करण्याच्या निर्णयावरही ठाम राहिल्याचे सांगितले.

याशिवाय, साक्षीने बबिता फोगटवरही टीका करत, तिने चळवळीमध्ये स्वार्थी हेतूने सहभाग घेतला असल्याचा आरोप केला आहे.

Review