रमेश चेन्निथलांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA)च्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महत्त्वपूर्ण माहिती देत २५ ऑक्टोबरपर्यंत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईल असे स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर?

रमेश चेन्निथलांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (MVA)च्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी महत्त्वपूर्ण माहिती देत २५ ऑक्टोबरपर्यंत जागावाटपाचा अंतिम निर्णय जाहीर होईल असे स्पष्ट केले आहे.

चेन्निथला म्हणाले, "२२ ऑक्टोबर रोजी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत तिढा मिटवला जाईल. आजच्या बैठकीत आम्ही ६३ जागांवर चर्चा केली असून, लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल." त्यांनी स्पष्ट केले की, मुंबईत काँग्रेस आणि मित्रपक्षांशी चर्चा झाल्यानंतर जागावाटपाची यादी जाहीर केली जाईल.

शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात काही जागांवर पेच निर्माण झाला होता. मात्र, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आता फक्त ७ ते ८ जागांवरच तिढा उरला आहे, आणि तो २२ ऑक्टोबरच्या बैठकीत सुटेल अशी शक्यता आहे.

चेन्निथला यांनी देखील स्पष्ट केले की, महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मोठे मतभेद किंवा वाद नाहीत. तसेच, काँग्रेसच्या प्रचार मोहिमेत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाही सक्रिय सहभाग असेल.

बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांमधील फेरफारांबाबत तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

Review