पिंपरी विधानसभा निवडणूक 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच

पिंपरी चिंचवड, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अण्णा बनसोडे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ: महाविकास आघाडी की महायुती? कोणाला मिळणार पिंपरीकरांचा कौल?

पिंपरी विधानसभा निवडणूक 2024: महाविकास आघाडी आणि महायुतीत रस्सीखेच

पिंपरी चिंचवड, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अण्णा बनसोडे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला होता.

सध्या, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख गटांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. महायुतीमध्ये अजूनही काही नेत्यांनी उमेदवारीसाठी तयारी चालवली आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेसनेदेखील या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत.

पिंपरी मतदारसंघामध्ये २०१९ च्या निवडणुकीत अण्णा बनसोडे यांनी ८६,९८५ मते मिळवत विजय मिळवला होता, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांना ६७,१७७ मते मिळाली होती. आता २०२४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात एकूण ३,६४,८०६ मतदार आहेत, आणि कोणता पक्ष विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीमध्ये विद्यमान आमदाराला पुन्हा उमेदवारी मिळेल का, की कोणता नवीन चेहरा समोर येईल, हे लवकरच स्पष्ट होईल. या निवडणुकीत पिंपरीकरांचा कौल कोणाला मिळेल, महाविकास आघाडीला की महायुतीला, हे येणाऱ्या काही दिवसांत ठरेल.

Review