पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये इंधन टंचाईचे सावट

पेट्रोल पंपचालकांचे आंदोलन

पुणे, १६ ऑक्टोबर २०२४:
पेट्रोलियम कंपन्यांकडून मागण्या मान्य न झाल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पंपचालकांनी इंधन भरण्यासाठी त्यांच्या टँकर पाठवणे थांबवले असून, त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच सातारा जिल्ह्यात इंधन टंचाईचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये इंधन टंचाईचे सावट: पंपचालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये इंधन टंचाईचे सावट

पेट्रोलियम कंपन्यांकडून मागण्या मान्य न झाल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. पंपचालकांनी इंधन भरण्यासाठी त्यांच्या टँकर पाठवणे थांबवले असून, त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, तसेच सातारा जिल्ह्यात इंधन टंचाईचा तुटवडा जाणवू लागला आहे.

पेट्रोल पंपचालकांचे आंदोलन

पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केलेल्या या आंदोलनामुळे शहरातील अनेक पंपांवरील इंधन साठा संपत चालला आहे. पंपचालकांचे म्हणणे आहे की, पेट्रोलियम कंपन्या सुरक्षित वाहतुकीसाठी चुकीच्या निविदा प्रक्रिया राबवतात आणि यामुळे इंधन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारपासून हा आंदोलनाचा निर्णय घेतला गेला.

आंदोलनाचे मुख्य कारण

असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले की, इंधन टंचाईमुळे नागरिकांची गैरसोय झाल्यास पेट्रोलियम कंपन्यांना जबाबदार धरण्यात येईल.

पंपचालकांच्या मुख्य मागण्या

इंधन वाहतुकीच्या सर्व निविदा त्वरित रद्द कराव्यात.
सुरक्षित वाहतुकीसाठी व्यवहार्य दरांसह नवीन निविदा काढाव्यात.
सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करावे.
इंधन चोरीतील अधिकाऱ्यांच्या सहभागाची पोलीस चौकशी व्हावी.

Review