घडयाळ; चिन्हावर सुनावणी १५ ऑक्टोबरला; शरद पवार गटाची न्यायालयाला विनंती
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ‘घडयाळ’ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. शरद पवार गटाच्या वतीने बुधवारी सादर केलेल्या अर्जावर १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
‘घडयाळ’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात १५ ऑक्टोबरला सुनावणी
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ‘घडयाळ’ हे चिन्ह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वापरण्यास मनाई करावी, अशी विनंती शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. शरद पवार गटाच्या वतीने बुधवारी सादर केलेल्या अर्जावर १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकार आणि ‘घडयाळ’ चिन्ह दिले आहे. या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि उज्जल भुईया यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे. मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून १५ ऑक्टोबरला नवी तारीख देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘घडयाळ’ चिन्हाच्या वापरामुळे मतदारांमध्ये गोंधळ झाला होता, ज्याचा शरद पवार गटाला फटका बसला. विधानसभा निवडणुकीत हा गोंधळ टाळण्यासाठी शरद पवार गटाने न्यायालयाकडे अजित पवार गटाला ‘घडयाळ’ चिन्ह वापरण्यास मनाई करण्याची मागणी केली आहे.
शरद पवार गटाच्या मते, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अंतिम निकाल येईपर्यंत अजित पवार गटाला नवे निवडणूक चिन्ह देण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.